रामटेक: बोथिया पालोरा येथे पतीचा संशयास्पद मृत्यू, तर पत्नी गंभीर
Ramtek, Nagpur | Aug 1, 2026 पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या बोथीया पालोरा येथे सागर धर्मराज परतेती वय 23 वर्ष या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याची पत्नी रायवंती परतेती वय 22 वर्ष हिची प्रकृती एक ऑगस्टला ही सायंकाळपर्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. ती नागपूर येथील दवाखान्यात भरती असून तिचे उपचार सुरू आहेत.