रामटेक: रामधाम मनसरच्या चलचित्राला मिळाला प्रथम पुरस्कार
Ramtek, Nagpur | Apr 18, 2026 रामनवमीच्या पावन-पर्वा वर पोदारेश्वर राम मंदिर नागपूरच्या वतीने प्रतिवर्षी परंपरेनुसार भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यावर्षी सुद्धा ही शोभायात्रा काढण्यात आली. यात सामील विविध चलचित्रांना पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा शनिवार दिनांक 18 एप्रिल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात रामधाम मनसर रामटेकच्या चलचित्राला प्रथम पुरस्कार देण्यात आला.