अमरावती: भारतीय बौद्ध महासभेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, संविधानाची विटंबना करणाऱ्यावर कारवाईची मागणी
परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या घटनेनंतर आंबेडकरी व बौध्द समाज बांधव आक्रमक झाले आहे. सोमवारी दि.16 डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. तसेच संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्या नुसार कठोर कारवाई करावी,अशी प्रमुख मागणी केली. यासह अन्य मागण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिले.