गोंदिया तालुक्यात २१ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेत ६५ हून अधिक स्टॉल्स लागले. रानभाज्यांचे आरोग्यदायी गुणधर्म आणि त्यांचा आहारात समावेश यावर भर देण्यात आला. महिलांना आर्थिक संधी दिल्या गेल्या व ३५४३० रुपयांची उलाढाल झाली.