नागपूर शहर: नागपुरातील बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांड प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार राजू भद्रेची निर्दोष मुक्तता
नागपूरच्या कुख्यात गुंड राजू भद्रे याची पिंटू शिर्के हत्याकांडातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्याची जन्मठेप कायम ठेवली होती. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान हा कुख्यात गुन्हेगार जेलमधून बाहेर पडणार असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. नागपूर शहरात पिंटू शिर्के हत्याकांड चांगलेच गाजले होते.