कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत लिंगा येथे गव्हाच्या गंजीला आग
कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावात शेतात साठवून ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावण्याची घटना गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडली या आगीत अंदाजे 20 क्विंटल गहू जळून खाक झाला आहे लिंगा येथील शेतकरी नारायण मनोहर हत्ती यांनी सव्वा एकर शेतात गव्हाची लागवड केली याप्रकरणी शुक्रवारी कळमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली