नागपूर शहर: आशिष शेलारांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल; नागपुरात मस्कऱ्या गणपतीचे घेतले दर्शन
नागपुरातील २३९ वर्षांची परंपरा असलेला 'मसकऱ्या हडपक्या गणपती' राज्य महोत्सवाचा भाग असल्याने दर्शनासाठी आल्याचे शेलार यांनी सांगितले. राहुल गांधींचे आंदोलन म्हणजे केवळ 'स्टंटबाजी' असून, कार्यालयात जाऊन केलेले आंदोलन चुकीचे आहे. निवडणूक यंत्रणेवर शंका घेणाऱ्यांनी आधी केरळ आणि तामिळनाडूमधील काँग्रेस सरकारचा राजीनामा द्यावा, असा टोला त्यांनी लगावला.विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी दूर करून सरकार त्यांना न्याय देईल आणि सुरळीत परीक्षा पार पाडेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.