जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर, ग्रामीण पो. स्टे. आणि मेहुणबारे पोलीस स्टेशन तर्फे दिनांक 18/07/26 रोजी 09.00 वाजता प्राचार्य वसंत हंकारे यांच "न समजलेले आईबाप " या विषयावर व्याख्यान चाळीसगाव शहरात आयोजित करण्यात आले होते..
चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील जवळपास 3000 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. श्री हंकारे यांच हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी, पालक व उपस्थितांच डोळे पाणावले होते.
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच; पण गुन्हा घडू नये, कुटुंब मजबूत व्हावे आणि समाज सुदृढ व्हावा यासाठी जनजागृती करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मुलांना आई वडील समजत नाहीत आणि पालकांनाही मुलांचे मन समजून घेणे कठीण जाते. या दरीतून अनेक कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. अश्या कार्यक्रमामुळे पालक आणि मुलानं मधील दुरावलेला संवाद दृढ होईल. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत हा कार्यक्रम आयोजित केला होता.
56 views | Jalgaon, Maharashtra | Jul 20, 2026