चाळीसगाव: टाकळी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत ५६ वर्षीय इसम ठार, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यात टाकळी हे गाव आहे. या गावातून रस्ता ओलांडत असताना बापू पुंडलिक पाटील वय ५६ पवन रावसाहेब सूर्यवंशी याने ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.५२ बी. ०५९० याद्वारे धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात महेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून पवन सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.