कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या मनोरुग्ण तरुणीचा शोध घेण्याचे नागरिकांना आवाहन
हरवलेल्या मनोरुग्ण तरुणीचा शोध – नागरिकांना आवाहन रोशनी साबळे (वय २५ वर्षे) ही तरुणी आज आमला (मध्य प्रदेश) येथून आपल्या वडिलांसोबत रेल्वेने भरतवाडा येथे आली होती. कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत भरतवाडा रेल्वे स्थानकावर उतरल्यावर वडिलांची नजर चुकवून ती तेथून कुठेतरी निघून गेली असल्याची माहिती तिच्या वडिलांनी डायल 112 वर दिली आहे.सदर तरुणी मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. तिच्या अंगावर कथ्था रंगाचा सलवार व जांभळ्या रंगाची ओढणी आहे.