नागपूर शहर: नागपूर सिटिझन्स फोरमची ‘सुधरा नागपूरकर’ मोहीम; गांधीबाग चौकात वाहतूक जनजागृती
,नागपूर सिटिझन्स फोरमच्या ‘सुधरा नागपूरकर’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत रविवारी गांधीबाग चौक येथे वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. तसेच ही मोहीम आगामी काही दिवसात शहराच्या मुख्य वाहतुकीच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.या उपक्रमादरम्यान फलकांच्या माध्यमातून वाहनचालक व नागरिकांना वाहतूक सिग्नलचे पालन करा, सिग्नल जंप करू नका, हेल्मेट वापरा, सीटबेल्ट लावा.