स्थानिक गुन्हे शाखेने मौजपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत एका व्यक्तीस विदेशी दारूसह अटक केली असून त्याच्याकडून 1 लाख 3 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी गस्त घालत असताना अरविंदी प्रकाश लांडगे (रा. जामवाडी, ता. जि. जालना) हा मंठा-जालना रोडवर आढळून आला.