जालना: 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या दोन श्वानांना जीवदान; छत्रपती संभाजीनगरहून 90 किमीचा प्रवास; रेस्क्यू टीमच्या धाडसी प्रयत्न
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात सुमारे 60 फूट खोल धोकादायक विहिरीत पडलेल्या दोन श्वानांची मॅनविथइंडिज फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने सुखरूप सुटका केली. विहिरीची खोली आणि बचावकार्यादरम्यान निर्माण होणारा धोका लक्षात घेता अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. रेस्क्यू टीमच्या कौशल्यपूर्ण आणि धाडसी प्रयत्नांमुळे दोन्ही श्वानांना जीवदान मिळाले. बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जामवाडी शिवारातील एका विहिरीत दोन श्वान पडले होते.