रामटेक: रामधाम तीर्थ मनसर येथे सामूहिक विवाह सोहळ्यात 51 जोडप्यांचे शुभमंगल
Ramtek, Nagpur | Apr 21, 2026 धार्मिक पर्यटन स्थळ रामधाम तीर्थ मनसर येथे मंगळवार दि.21 एप्रिलला सकाळी 11 ते सायं. 5 वाजता पर्यंत सर्व धर्मीय आदर्श सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण 51 जोडप्यांचे शुभमंगल झाले. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे 18 वे वर्षे होते. रामधाम तीर्थ येथे आयोजित समारोहाची अध्यक्षता पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केली. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार सौ मायाताई इवनाते,नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन, लक्ष्मणराव मेहर, संध्याताई चौकसे,राजूभाऊ राऊत सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.