जालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेशीम बाजारपेठेचे उद्घाटन; 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा जालना दौरा
Jalna, Jalna | Aug 11, 2026 जालना जिल्ह्यात सुरू होणार्या रेशीम बाजारपेठेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी जालना दौर्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मंगळवार, दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दिली. जालना जिल्ह्यात सुरू होणारी रेशीम बाजारपेठ ही जिल्ह्यासाठी तसेच जालनेकरांसाठी महत्त्वाची आणि अभिमानाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.