जालना: दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावणार – महापौर वंदना मगरे सामाजिक न्याय भावनात दिव्यांग मार्गदर्शन मिळवा संपन्न
Jalna, Jalna | Aug 10, 2026 दिव्यांगांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज असून, जालना महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महापौर वंदना मगरे यांनी दिली. अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजित दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर राजेश राऊत होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले, पत्रकार गणेश मगर, अपंग जनता दल