मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन अरोली-खात शिवारात अरोली पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Mar 26, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांच्या पथकाने अरोली-खात शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरून पोलिसांनी वाहन जप्त करण्यात आले असून जनावरे गोरक्षण मध्ये सोडण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अरोली पोलीस करीत आहेत.