कळमेश्वर: केबल चोरी करणारे आंतरजिल्हा टोळीचे पाच आरोपी गजाआड, नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
कळमेश्वर आणि कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे पोलिसांनी याप्रकरणी पाच सराई आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीत वापरलेल्या दोन मोटार सायकल आणि रोकड सह एकूण दोन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे केबल चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आले आहे