सांगोला: हवामान बदलामुळे डाळिंब संशोधनाला नवी दिशा; तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद सुरू
हवामान बदलामुळे डाळिंब पिकांवर वाढत असलेल्या समस्यांवर संशोधनाला गती देण्यासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद 7 तारखेला सुरू झाली. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उद्घाटन केले.