🚨 अमरावती शहर पोलीस | सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६ 🚨
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सायबर प्रतिज्ञा उपक्रम संपन्न!
दिनांक ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे माजी पंतप्रधान श्री. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत 'सायबर प्रतिज्ञा' (Cyber Pledge) घेण्यात आली.
महाराष्ट्र सायबरच्या 'सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६' या राज्यव्यापी अभियानांतर्गत दिनांक ०१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांचा एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याची, ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगण्याची तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करण्याची प्रतिज्ञा घेतली.
"क्लिक करण्यापूर्वी विचार करा!"
सायबर सुरक्षिततेची सुरुवात आपल्या एका सजग क्लिकपासून होते. चला, सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी जागरूक नागरिक बनूया!
अमरावती शहर पोलीस
महाराष्ट्र सायबर पोलीस
🚨 सायबर सुरक्षित रहा… सतर्क रहा! 🚨
@mahacyber
#CyberAwarenessMonth2026#CyberAwareness #CyberPledge #thinkbeforeyouclick
Amravati, Maharashtra | Oct 2, 2026