जालना: सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा उच्छाद;उघड्यावर दारु पिण्याचा प्रकार सुरु;राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
Jalna, Jalna | Aug 8, 2026 कदीम जालना पोलीस ठाणे तसेच दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्यांचा उपद्रव वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. अंबड चौफुली परिसरातील समर्थनगर येथील मारुती शोरूमच्या मागील बाजूस रोडलगत तसेच मोकळ्या जागेत मद्यपींच्या टोळ्या खुलेआम दारू पित असल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवार दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात स्थानिक नागरीकांनी पोलीसांकडे तक्रार केली असून प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे