खूनाच्या प्रयत्नात जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला जामीन झाल्यानंतर सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात गुन्हेगारासोबतचे रिल्स काढून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करून दहशत माजविणार्या विरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली.अशी माहिती माहिती कक्षातुन ३० सप्टे रोजी रात्री देण्यात आली.