रामटेक: अंबाळा जलाशय किनारी ब्रेक फेल झालेल्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन विद्युत खांब पडले; मोठा अनर्थ टळला
Ramtek, Nagpur | May 24, 2026 रामटेक नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अंबाळा तीर्थस्थळी रविवार दिनांक 24 मे ला सकाळी भीषण अपघात टळला. मात्र यात दोन विद्युत खांब तुटल्याने परिसराचा विद्युत पुरवठा बंद झाला होता. माहितीप्रमाणे एक खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन अंबाळा जलाशय परिसरात पोहोचली. मात्र या दरम्यान ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित होऊन थेट जलाशयाच्या रस्त्याचा कडेला असलेल्या विद्युत खांबावर आढळली.