समुद्रपूर: गिरड येथील बाबा फरीद दरगाह टेकडीवर करण्यात आली ११ हजार सिडबॉल व वृक्षलागवड
गिरड येथील मगन संग्रहालय समिती व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी परीसरात १ लाख वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून याच अनुषंगाने येथिल गुरुकुल विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ८ हजार सीड बॉल तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ३ हजार सिड बॉल तयार केले.या सर्व ११ हजार सिडबॉलची लागवड बाबा फरीद दरगाह टेकडी परीसरात लावड करण्यात आली आहे.