समुद्रपूर: मोहगांव येथे पावसाने घर कोसळून मोठे नुकसान: सुदैवाने आजी नातू थोडक्यात बचावले
मोहगांव येथे पावसामुळे अचानक घर कोसळले घरात असलेले आजी,नातू थोडक्यात बचावले असुन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आमदार समिरभाऊ कुणावार यांना माहिती मिळताच त्यांनी स्वताकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.प्राप्त माहितीनुसार १ आगस्टला पहाटे ५ वाजताच्या सुमारास मोहगांव येथिल रहिवासी मालन बालाजी राऊत यांचे घर पावसाने अचानक कोसळले यावेळी मालन राऊत व त्यांचा नातु घरात झोपून होते अचानक घर कोसळण्याचा आवाज येताच आजी नातू घराबाहेर पळाल्याने दोघेही थोडक्यात बचावले