समुद्रपूर: मोहगांव येथे पडलेल्या घराची राकॉपा शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पाहणी करुन केली आर्थिक मदत
समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या शेत्यां, रस्ते, पुल, घरे उद्ध्वस्त झाले आहे. मोहगाव या गावात अतिवृष्टीने मालनबाई राऊत यांचे घर सततच्या पावसामुळे पूर्ण घर पडले. त्यावेळी घरी मालनबाई राऊत व त्यांचा नातू घरामधे उपस्थित होते.यामध्ये त्या देखील दबल्या गेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पडलेल्या घराची पाहणी करुन केली आर्थिक मदत केली.