पनवेल: उलवे येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
Panvel, Raigad | Feb 19, 2026 उलवे नोडमधील रयत शिक्षण संस्थेच्या शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना 'यशोगाथा' अशी ठेवण्यात आली होती. या माध्यमातून भारतातील विविध राज्यांमधील महान योद्ध्यांचा इतिहास लघुपटाद्वारे मांडून त्यावर आधारित आकर्षक नृत्याविष्कार सादर करण्यात आले. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.