धुळे: शिरपूर तालुक्यातील जळोद गावाजवळ पूल बांधकामात भ्रष्टाचार: क्यूमाईन क्लब समोर समाजवादी पार्टीचे धरणे आंदोलन
Dhule, Dhule | Aug 28, 2024 शिरपूर तालुक्यातील जळोद गावाजवळील नुकत्याच बांधलेल्या पुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत समाजवादी पार्टीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ क्यूमाईन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.