रामटेक: बाबा गुंजू शाह दर्ग्यावर पडली विज ; कुठलीही हानी नाही
Ramtek, Nagpur | Jun 28, 2026 रविवार दिनांक 28 जून च्या सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान रामटेक शहरात प्रचंड विजेच्या कडकडाटात जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली.या दरम्यान रामटेक शहराच्या उत्तर - पश्चिम दिशेला शहराबाहेर असलेल्या बाबा गुंजू शहा दर्ग्यावर 4. 35 वाजताच्या दरम्यान वीज पडली. उल्लेखनीय म्हणजे रविवारला रात्री येथे सहामाही उर्सचे आयोजन करण्यात आले आहे.