रामटेक: पवनी येथे तीन दुकानात शिरले चोरटे; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Ramtek, Nagpur | Apr 14, 2026 रामटेक तालुक्यातील नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस स्टेशन देवालापार अंतर्गत येणाऱ्या पवनी येथे मंगळवार दिनांक 14 एप्रिलच्या रात्री दीड वाजताच्या सुमारास तोंडाला फडके बांधलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरीचा तपशील पोलिसांच्या पंचनाम्यानंतरच स्पष्ट होणार आहे.