रोहा: रोहेकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध
Roha, Raigad | Jun 22, 2026 नळ पाणीपुरवठा योजना तोट्यात असूनही नगरपरिषद योजना चालवत आहे. परंतु नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, पुढील पाच वर्ष पाणीपट्टी वाढविणार नाही. अशी माहिती नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती महेश कोलाटकर, मयुर दिवेकर, निता हजारे, रवी चाळके, नगरसेविका पुर्वा मोहीते, अजित मोरे, प्रशांत कडु, फराह पानसरे आदीसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.