रामटेक: पथदिवे बंद असल्याने रामटेक बायपास रोड अंधारात
Ramtek, Nagpur | Apr 26, 2026 मागील चार दिवसांपासून रामटेक बायपास रोडवरील पथदिवे राखी तलाव चौक पासून बस स्टँड रामटेपर्यंत बंद असल्याने या महामार्गावर अंधार पसरला आहे. यामुळे वाहनधारकांना त्रास होतो आहे. तर दुचाकी चालक सायकल स्वार व पायी येणाऱ्या जाणाऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. या मार्गावर अगदी पहाटे व सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत फिरणारे वृद्ध महिला, पुरुष महिलांसोबतच लहान मुलांनाही त्रास होत असल्याने दैनंदिन फिरणाऱ्या काही मंडळींनी तूर्तास फिरणे बंद केले आहे.