शहादा: भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदुरबार येथे दाखल होणार, शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री ॲड.पाडवी यांची माहिती
भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदुरबार येथे दाखल होणार आहे. शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री ॲड.पाडवी यांनी आज दुपारी माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दाखल होणार असून या न्याय यात्रेचे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणून घोषित करण्यात आले आहे. राहुल गांधी सोनगड येथून नवापूर मार्गे नंदुरबार येथील पोलीस ग्राउंडवर दुपारी १२.३० वाजता दाखल होणार असून यानंतर सीबी पेट्रोल पंप येथून आदिवासी न्याय यात्रा काढण्यात येणार आहे.