शहादा: हॉटेल जैन प्लाझा शेजारी असलेल्या सराफा दुकानात दोन लाखांची चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा शहरातील हॉटेल जैन प्लाझा शेजारी असलेल्या सराफा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. नोंद झालेली नव्हती. मुख्य रस्त्यावर असलेले निर्मल ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आणि शटर टॉमीने उचकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी दुकानातील दुरुस्तीसाठी आलेले दागिने, मूर्ती व इतर वस्तू असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.