रामटेक: रामटेक शहरात विविध महिला मंडळांनी केले बाबासाहेबांना अभिवादन
Ramtek, Nagpur | Apr 14, 2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रामटेक शहरातील महिला संघटना, महिला मंडळांनी सुद्धा सांस्कृतिक पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले. मंगळवार दिनांक 14 एप्रिल ला दुपारी महिला मंडळाच्या एकता हूमने, ज्योतीताई कोल्हेपरा, मंजू खडोतकर, अर्चना वाघमारे, अर्चना मेश्राम, मंजिरी येरपुडे, बबिता सावरकर, मनीषा खडोतकर,शोभा अडामे, रूपाली भागलकर,, भारती जांगडे यांनी बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.