पालघर: बोईसर येथे भाजपच्या वतीने पाकिस्तान वरील ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर साजरा करण्यात आला आनंदोत्सव
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले यांतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर बोईसर येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडून, पेढे वाटून, भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.