गडहिंग्लज: लिंगनूर-हेब्बाळ मार्गावर बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लिंगनूर-हेब्बाळ जलद्याळ मार्गावर शुक्रवारी रात्री बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. टेम्पोचालकाला बिबट्या दिसला. दोन दिवसांपूर्वीच मांगनूर-सावतवाडी भागात बिबट्याने एका बकरीचा जीव घेतला होता.