गणेशदर्शनासाठी थांबली पावले; ‘दादां’चा जीवनप्रवास पाहण्यात रंगले पुणेकर!
चंदननगरमधील ओम नवग्रह प्रतिष्ठाणच्या गणेशोत्सवात यंदा ‘महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री अजित अनंतराव पवार’ या विषयावरील देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसमोर अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील विविध टप्पे, विकासकामे, महत्त्वाचे निर्णय आणि गाजलेली वक्तव्ये मांडण्यात आली आहेत. देखाव्यातील बॅनर वाचण्यासाठी अनेकांची पावले थांबत असून, काहीजण हे क्षण मोबाईलमध्येही टिपताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, मंडळाने दररोज अजित पवार यांच्या जीवनप्रवासावर आधारित लघुपट आणि विविध भाषणांचे प्रदर्शन सुरू केले आहे. त्यामुळे गणेशदर्शनासोबतच त्यांच्या सार्वजनिक प्रवासाची माहिती जाणून घेण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.
या देखाव्यामागे मंडळाचे आधारस्तंभ किरण खैरे यांची संकल्पना असून, अध्यक्ष नरेंद्र पांडुरंग साबळ�
Haveli, Pune | Sep 18, 2026