परतूर: मोठी टाकी परिसरात व शहरात नागरिकांना करावा लागत आहे पाणी टंचाईचा सामना
Partur, Jalna | Jul 15, 2026 आज दिनांक 15 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील नागरिक पाणी टंचाईचा सामना करत असल्याचे पाहायला मिळाले आहे,मोठी टाकी परिसरामध्ये दुधना प्रकल्प मधून पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र सतत खंडित वीज पुरवठा, विद्युत मोटार जळणे, विद्युत मोटार बंद पडणे या सारख्या अडचणी मुळे शहरातील 35 हजार नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून या सर्व बाबीकडे संबंधित विभागाचे अधिकारी व विभागाने वेळीच लक्ष देऊन सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.