समुद्रपूर: गिरड परीसरात वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस: नागरिकांना गर्मी पासून दिलासा: जनावरांच्या वैरणीचे नुकसान
समुद्रपुर तालुक्यातील गिरड गावासह परीसरात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पावस हजरी लावली यावेळी अचानक मेघगर्जनेसह विजेच्या कळकळासह आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून यावेळी अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर जवळपास १ तास झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेली जनावरांची वैरण ओली होऊन नुकसान झाले असले तरी दोन दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या तडाख्याने गर्मीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.