समुद्रपूर: १२ वीच्या परीक्षेत राशी ओस्तवाल ९४.६७ %घेऊन तालुक्यात प्रथम:तर तर पवन बुरीले ९४.५०% घेऊन दुसरा
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज मंगळवारी २१ मेला जाहिर झाला असून समुद्रपुर तालुक्यातील वासी येथिल जे. डी.चौधरी.जु.सायन्स कॉलेज या महाविद्यालयाचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बारावी चा निकाल १०० टक्के लागला असून येथे एकुण १७६ परीक्षार्थी होते यात राशी ओस्तवाल हिने ९४.६७% गुण मिळाले असून ती तालुक्यातून प्रथम आली आहे.तर पवन बुरीले याने९४.५०% गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोघांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.