घोनाडी आरोग्य उपकेंद्रात भव्य आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर
2 views | Deori, Gondia | Feb 19, 2026 देवरी : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांना गंभीर आजारांपासून मुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग, देवरी अंतर्गत घोनाडी आरोग्य उपकेंद्रात एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या 'त्रिवेणी' संगमात सिकलसेल चाचणी, 'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती आणि असांसर्गिक आजार स्क्रीनिंग अशा तिन्ही मोहिमांचा धडाका पाहायला मिळाला.