भंडाऱ्याचा प्रसाद घरी आणण्याच्या कारणावरून भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली असून उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी रेखा दत्तू बोरसे राहणार बोधले नगर यांनी दिलेल्या नुसार फिर्यादी यांचा भाऊ सनी बोरसे याने त्याचा भाऊ योगेश याला भंडाराचा प्रसाद घरी आणण्याच्या कारणावरून वादविवाद घातला. व लाथा बुक्क्याने, लाकडी दांडक्याने मारहाण केली, तसेच कपाळावर पाठीवर मारून जीव ठार मारले. सनी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.