भिवापूर: भिवापूर - नक्षी मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात, पावसाळ्यात कामाच्या टिकाऊपणा बाबत नागरिकांमध्ये चर्चा
भिवापूर–नक्षी मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. पुलावरील खराब झालेला भाग दुरुस्त करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काम सुरू असून, संबंधित ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात हे काम किती काळ टिकेल, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.