धुळे: मोटर सायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले चोरीच्या मोटरसायकलीसह देवपूर परिसरातून जेरबंद
Dhule, Dhule | Sep 5, 2024 धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मोटारसायकल चोऱ्यांचा सूत्र धरून स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत दोन आरोपींना अटक करून 20 चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंकज सुभाष नलावडे आणि सुरज तानाजी गवळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सखोल चौकशी केल्यानंतर दोघांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.