धुळे: सोनगीर फाटा परिसरात कंटेनरसह लाखोंचा गुटखा जप्त, सोनगीर पोलिसांची कामगिरी
Dhule, Dhule | Sep 5, 2024 सोनगीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. सोनगीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिरपूरकडून मुंबईकडे जात असलेल्या एका कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा भरून आणला जात होता. पोलिसांनी सोनगीर फाट्यावर सापळा लावून कंटेनरची तपासणी केली असता कंटेनर मध्ये लाखोंच्या गुटखा पोलिसांना आढळून आला. कंटेनरसह या मुद्देमालाची किंमत 26 लाख 81 हजार 440 रुपये इतकी आहे.