समुद्रपूर: कवठा येथे गोठ्याला आग लागून २ बैल एक गाय व वासरू ठार शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान:
कवठा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शॉटसर्कीटमुळे गोठ्याला आग लागून गोठ्यात असलेले २ बैल १ गाय १ वासरू जागीच ठार झाले तर गोठ्यात असलेली जनवरांची वैराण शेतीचे साहित्य जळून शेतकऱ्याचे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार कवठा येथिल शेतकरी बाबाराव घाटे यांचा गावा शेजारी जनवरांचा गोठा आहे.शुक्रवारी सायंकाळी त्यांनी आपल्या ४ बैलाला चारापाणी करुन पाऊस सुरू असल्याने गोठ्यात बांधून ठेवले होते याच दरम्यान विद्युत प्रवाहाच्या शार्टसर्कीट ने गोठ्याला आग लागली