पालघर: वसई- माणिकपूर मार्केट परिसरातील ट्रान्सफॉर्मरला लागली भीषण आग; अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण
वसईतील माणिकपूर मार्केट परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक ट्रान्सफॉर्मरला आग लागली व आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अग्निशमन दालाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.