नरखेड: उमठा येथे अवैध दारूभट्टीवर जलालखेडा पोलिसांची कारवाई
Narkhed, Nagpur | Jun 15, 2026 जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा उमठ येथे अवैध मोहफुलाची दारू बनवणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी पवन दाऱ्या पवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून ६५ लिटर मोहफुलाची दारू, ८०० लिटर रसायन आणि प्लास्टिक ड्रम्स असा एकूण ३८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.