भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत रेती तस्कर टोळीतील पाहिजे आरोपीला अटक
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस स्टेशन भिवापूर येथे बनावट परवाना तयार करून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करणारा टोळीप्रमुख तसेच आठ टोळी सदस्य अशा एकूण नऊ आरोपिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दिनांक 7 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्याच्या माहितीवरून सदर पुण्यातील पाहिजे आरोपी नामे शैलेंद्र उर्फ जितू कडू वैद्य यास मौजा तरोडी जबलपूर बायपास येथून ताब्यात घेतले